Monday 16 January 2012

***
पतंग ...आकाशात स्वछंद उडणारे.....
संक्रांत आली की मुलांना पतंगात वेड लागतं... तहाण, भुक विसरुन ऊन्हाची तमा बाळगता... रस्त्यावर... घराच्या छतावर  नुसते त्या पतंगामागेच पळत असतात...कधी वाटतं अस असतं तरी काय त्या पतंगात...??
पतंग...म्हणजे नुसतं कागद नसते तर ताकद असते उडण्याची....काटण्याची... काटल गेल तरी परत उडण्याची....पतंग म्हणजे आपल्या आकांक्षा, महत्तवकांक्षा... वाऱ्‍याची दिशा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीमधील संधी... मांजा म्हणजे आपले प्रयत्न आणि त्याची फिरकी म्हणजे साधनसंपत्तीचा साठा... पतंगाच आकाश म्हणजे आपलं कार्यक्षेत्र तर पतंगाची काटाकाटी म्हणजे व्यावसायिक स्पर्धा.... आकाशात पतंगाच वर्चस्व म्हणजे आपण आपल्या कार्यक्षेत्रात सिद्ध केलेली कर्तबगारी......
पतंग उडवायलाही काही कौशल्य लागतात... मांजा हातात घेतला की बोट कापणार याची तयारी ठेवुनच ते हाताळाव लागतं... त्याला योग्य वेळी ढिल आणि जरा घट्ट करता यायला हवं, तरच तो आकाशात उडतो... अगदी नातेसंबंधांसारखं..त्यांनाही जास्त ढिल देवुन चालत नाही.. थोडी बंधने घालावी लागतात...मांजा कधी सोडुन चालत नाही तसेच प्रयत्न देखील ते सोडुन यश हाती लागत नाही...पतंग जो पर्यँत दुकानात असतो तो पर्यँत निर्जीव असतो... पण आकाशात उंच उडालेला आणि कटुन आलेला पतंग हा जिवंत असतो... वारा प्यालेला, उंच जावुन आलेला, वाऱ्‍याशी टक्कर घेत फडफडलेला आणि उरलासुरला मांजा तुटल्यावर पुर्ण स्वतंत्र झालेला असतो....
पतंग खरं तर आयुष्य जगायला शिकवतो.... जिंकण काय असतं ते शिकवतो...!
दिपीका...

No comments:

Post a Comment